वार्ताहर/ संगमेश्वर
संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयांत उपचार घेत असलेल्या तीन रूग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना मंगळवारी सायंकाळी डिस्चार्ज देण्यात आला. डॉर्क्ट्स, परिचारिका आणि उपचार करणाऱया सेवकांनी टाळय़ाच्या गजरात त्यांना निरोप दिला.
संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयातील उपचार घेत असलेलया देवळे, भडकंबा व तुरळ येथील रूग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. या तिघांचे कोरोना अहवाल 14 व 15 मे रोजी पॉझीटीव्ह आले होते. हे तिघेही मुंबईतून आलेले होते. 10 दिवस निगराणीखाली ठेवल्यानंतर त्यांच्यात कोणतीही लक्षणे दिसून न आल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. वैद्यकीय अधीक्षक अंबरीश आगाशे यांच्या देखरेखेखाली कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
संगमेश्वर तालुक्यात आतापर्यत 28 रूग्ण सापडले असून त्यातील एकाचा मंगळवारी मृत्यू झाला आहे. याआधी 8 जणांना डिस्चार्ज मिळाला होता. त्यात आता आणखी तिघांची भर पडल्याने आता 16 जण उपचाराखाली आहेत. मंगळवारी सांयकाळी टाळय़ांच्या गजरात पुष्पगुच्छ देऊन तिघांना निरोप देण्यात आला.