वार्ताहर/ संगमेश्वर
संगमेश्वरजवळच्या कोंड गणपती मंदिराजवळील नदीमध्ये सांबर मृतावस्थेत आढळून आले. त्यामुळे खळबळ उडाली असून सांबराचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, त्याचा शोध वनविभाग घेत आहे. कोंडगावमधील शास्त्राrनदीत आष्टाचा डोह येथे सांबर मृत्यू अवस्थेत असल्याची खबर पोलीस पाटील खानविलकर यांना मिळताच त्यांनी ही खबर तत्काळ वनविभागाला दिली. वनविभाग यासंबंधी तपास करत असून सांबराचा मृत्यू कसा झाला असावा, यासंबंधी विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत.