प्रतिनिधी / संगमेश्वर
तालुक्यातील खाडी भागातील कोंड्ये विभागाला काल जोरदार वादळाचा तडाखा बसला. या वादळात खाडी भागाला मोठा फटका बसला असून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे . महसूल विभागाने नुकसानीचे पंचनामे सुरू केले आहेत.
येथील सुरेश बोमे यांच्या घरावर पोफळीचे झाड कोसळुन मोठे नुकसान झाले आहे. तर दिपक शिंदे यांच्या घराचे सुद्धा मोठे नुकसान झाले, अशोक बोमे, आत्माराम बोमे, अनंत बोमे, बाळकृष्ण चिखलकर यांच्या घरावर कलम कोसळले. संतोष देसाई यांच्या गोठ्याचे छप्पर कोसळले. याचबरोबर मांजरे येथील विजय देसाइ यांच्या घरावर झाड कोसळून, विष्णू देसाई यांच्या घरावर झाड कोसळून मोठे नुकसान झाले. चंद्रकांत साळवी यांची १० कलमे जमिनदोस्त झाली. तर त्यांच्याही घराचे मोठे नुकसान झाले आहे.
या घटनेची माहिती मिळताच शिवसेना खाडी विभाग प्रमुख महेश देसाई, तलाठी तांदळे, सरपंच पूनम देसाई, सुरेश दसम ग्रामसेवक विजापूरे, संतोष देसाई यांनी घटनास्थळी जावून पहाणी केली.
कालच्या पावासामुळे कोंड्ये फुणगुस खाडी भागात मोठे नुकसान झाले असून पावसापेक्षा वादळाचा मोठा तडाखा बसल्याने येथील महावितरणच्या लाईन, पोल तुटले आहेत. गावातील जनजीवन विस्कळित झाले आहे. शासकीय यंत्रणेने त्वरित याचे पंचनामा करावा अशी मागणी होत आहे.