प्रतिनिधी/ चिपळूण, देवरूख, लांजा
जिल्हय़ातील काही भागाला शुक्रवारी सायंकाळी 6 च्या सुमारास सोसाटय़ाच्या वाऱयासह आलेल्या अवकाळी पावसाने चांगलेच झोडपून काढले. विशेषतः संगमेश्वर आणि चिपळूण परिसरात वादळी वाऱयासह गारांचा जोरदार पाऊस कोसळला. खेडसह लांजात वादळी पावसाने साऱयांचीच दाणादाण उडवली. रत्नागिरी नजीकच्या केळय़े, आंबेकोंड परिसरातही धो-धो पाऊस कोसळला. मुसळधार पडलेल्या पावसामुळे जिल्हय़ात ठिकठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या. यात ग्रामीण भागात झाडे, फांद्या तसेच घरावरील पत्रे, कौले उडून नुकसान झाले. अचानक आलेल्या अवकाळी पावसाने नागरिकांसह बाजारपेठेतील व्यापाऱयांची मात्र तारांबळ उडाली.
भोगाळेत झाड पडल्याने मुख्य रस्ता काही काळ बंद
चिपळुणात शुक्रवारी सायंकाळी 6 वा. वादळी वाऱयासह गारांचा जोरदार पाऊस कोसळला. यामुळे शहरातील भोगाळे परिसरात झाड पडल्याने मुख्य मार्गावरील वाहतूक काही काळ बंद पडली. ग्रामीण भागातही ठिकठिकाणी झाडे व फांद्या कोसळून किरकोळ नुकसान झाल्याच्या घटना घडल्या आहेत. पाऊण तास कोसळलेल्या या अवकाळी पावसामुळे व्यापाऱयांची तारांबळ उडाली. शुक्रवारी सकाळपासून उष्म्यात मोठी वाढ झाली होती. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार सायंकाळी 5.45 वा. ढगाळ वातावरण झाले होते. त्यानंतर सायंकाळी 6 वा. वादळी वाऱयासह गारांचा जोरदार पाऊस कोसळला. सोसाटय़ाचा वारा असल्याने अनेक दुकानांवरचे फलक उडून गेले. तसेच इमारतींवरील पत्र्यांचा जोरदार आवाज येत होता. त्यामुळे वातावरण भययुक्त झाले होते. पाऊणतास पाऊस बरसत होता. वादळी वाऱयामुळे शहरातील भोगाळे येथे मुख्य रस्त्यावर मोठे झाड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली होती. पाऊस कमी झाल्यावर नगर परिषदेने जेसीबी व कर्मचारी पाठवून झाड बाजूला करण्याचे काम सुरू केले होते. हे काम सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होते. या पावसामुळे पोफळी नाका परिसरात झाड कोसळल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. काही गावात झाडे व फांद्या कोसळल्याने घरे व अन्य मालमत्तांचे किरकोळ नुकसान झाले. अचानक आलेल्या पावसामुळे शहरातील रस्त्यांवर बसणाऱया किरकोळ विपेत्यांची तारांबळ उडाली. यात अनेकांचे साहित्य भिजले. पावसानंतर वातावरणात गारवा आला होता. दरम्यात दापोलीतही शुक्रवारी सायंकाळपर्यंत पाऊस कोसळला नसला तरी जोरदार वारे वाहत होते. रत्नागिरीतही शुक्रवारी सायंकाळी 6 च्या सुमारास गार वारे वाहत होते. वातावरणात थंडावा आला होता. दरम्यान रत्नागिरीनजीकच्या केळय़े-आंबेकोंड परिसरात धो-धो पाऊस बरसला.
खेडमध्ये पावसाने उडवली दाणादाण
खेड तालुक्यात शुक्रवारी सायंकाळी झालेल्या सोसाटय़ाच्या वादळी वाऱयाने साऱयांचीच दाणादाण उडवली. तब्बल अर्धा तास झालेल्या वादळाने अनेक ठिकाणी घरांचे पत्रे उडून नुकसान झाल्याचे वृत्त आहे. तालुक्यातील गुणदे येथे सायंकाळी उशिरा अवकाळी पावसाने हजेरी लावली तर शहरात रात्री 8 च्या सुमारास जोरदार पाऊस सुरू झाला. दरम्यान गुहागरमध्येही शुक्रवारी सायंकाळी जोरदार वाऱयामुळे हवेत गारवा निर्माण झाला होता. येथे पावसाचा फक्त शिडकावा झाला.
देवरूखसह संगमेश्वर, साखरपा परिसरात मुसळधार
देवरुखसह संगमेश्वर तालुक्यात शुक्रवारी सायंकाळी अचानक सोसाटय़ाच्या वाऱयासह मुसळधार पाऊस व गाराही कोसळल्या. शुक्रवारी सायंकाळी 4.45च्या दरम्यान अचानक वादळी वाऱयासह पावसाला सुरूवात झाली. देवरूखसह संगमेश्वर, साखरपा, माखजन, आंगवली पंचक्रोशीत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळला. काही ठिकाणी गाराही पडल्या. अनेक ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित झाला होता. अचानकपणे बरसलेल्या पावसामुळे नागरिकांसह व्यापाऱयांची तारांबळ उडाली. या पावसाचा आंबा व काजू बागायतदारांना फटका बसणार आहे.
धामापूर गावाला फटका
वादळी वाऱयासह कोसळलेल्या मुसळधार पावसाचा फटका संगमेश्वर तालुक्यातील धामापूर गावाला बसला. घरावरील पत्रे व नळे उडणे तसेच झाडाच्या फांद्या पडल्याने घरांचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्तमध्ये शांताराम भायजे, काशीराम कृष्णा भायजे, काशीराम धोंडू भायजे, मनोहर भायजे, प्रकाश रामाने, विनायक सागवेकर, गंगाराम गिज्ये, संतोष लाड यांचा समावेश आहे. करजुवे येथे झाड कोसळून थेट मार्गावर पडल्याने करजुवे-माखजन मार्गावरील वाहतूक बंद होती. वाऱयामुळे विद्युत खांब वाकणे विद्युत वाहिन्या तुटणे यामुळे परिसरातील विद्युत पुरवठा खंडित झाला होता.
लांजा-शिपोशीत वडाचे झाड कोसळले
लांजा तालुक्यात एकाच महिन्यात 3 वेळा पाऊस पडला असून शुक्रवारी सायंकाळी 5 च्या सुमारास तालुक्याच्या पूर्व भागात पुन्हा जोरदार पाऊस पडला. शुक्रवारी तालुक्यात दुपारपर्यंत कडक ऊन असताना सायंकाळी अचानक ढगाळ वातावरण पसरून 15 ते 20 मिनिटे पाऊस कोसळला. वादळाने शिपोशी येथे एका घराशेजारी मोठे वडाचे झाड पडले. यात घराशेजारील झोपडीचे नुकसान झाले. पावसाने गारवा पसरला होता.