वार्ताहर/ संगमेश्वर
संगमेश्वर तालुक्यातील साखरप्या पाठोपाठ शास्त्राrपूल येथे शनिवारी रात्री चार कावळे मृत अवस्थेत सापडल्याने खळबळ उडाली आहे. दापोली,लांजा नंतर आता संगमेश्वर तालुक्यातही मृत कावळे सापडल्याने आरोग्य विभागाने सतर्कतकेचा इशारा दिला आहे.
संगमेश्वर जवळच्या शास्त्राrपूल येथे वहाब दळवी यांच्या घरासमोर असलेल्या पळसाच्या झाडावरुन चार कावळे मृत अवस्थेत जमिनीवर पडले. शनिवारी रात्री 10वा सुमारास घडलेल्या घटनेनंतर वहाब दळवी यांनी लगेच तहसिलदार सुहास थोरात यांना घटनेची माहिती दिली. तसेच रविवारी सकाळी 10वा सुमारास पशुवैद्यकिय अधिकारी ढाकणे यांनी मृत कावळ्याचे अवशेष ताब्यात घेतले आणि अधिक तपासणीसाठी पूणे येथे पाठविले. त्याचा अहवाल येत्या दोन ते तीन दिवसात प्राप्त होणार आहे. काही दिवसापूर्वी साखरपा येथे मृत कावळा सापडला होता. त्यानंतर संगमेश्वर परिसरात चार मृत कावळे सापडल्याने आरोग्य विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.