संगमेश्वर / प्रतिनिधी
राहत्या घराच्या दरवाज्याची कडी तोडून आतमध्ये प्रवेश करून कपाटातील रोख रक्कम लांबविण्या प्रकरणी संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सुचिता संतोष कांबळे पीर धामापूर भुसेवाडी यांनी संगमेश्वर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या राहत्या घरी बंद असलेला दरवाजा अज्ञात इसमाने लोखंडी हत्याराने तोडला आणि आतमध्ये प्रवेश केला. घरातील कपाट फोडून आतमधील रोख रक्कम रुपये 18हजार 500 लंपास केले आहेत. संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.