- पुण्यात रविवारी मैफलीचे आयोजन
ऑनलाईन टीम / पुणे :
भारतीय अभिजात रागसंगीताम ध्ये मेवाती घरा ण्याच्या गायकी ची धुरा समर्थ पणे वाहिलेले संगीतमार्तंड पंडित जसराज यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी ललित कला केंद्र ( (गुरूकुल), सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे भीमसेन जोशी अध्यासन आणि संवाद, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष सांगितीक कार्यक्रमाचे आयोजन रविवार दिनांक 11 ऑक्टोबर 2020 रोजी करण्यात आले आहे. सकाळी 10.30 वाजता, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुख्य इमारतीमधील संत ज्ञानेश्वर सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.नितीन करमळकर भूषविणार असून प्रकुलगुरू डॉ.एन.एस. उमराणी आणि व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेश पांडे यांची विशेष उपस्थिती या कार्यक्रमाला लाभणार आहे.
या कार्यक्रमात प्रसिद्ध शास्त्रीय गायक डॉ.विकास कशाळकर, श्रीनिवास भीमसेन जोशी, प्रसिद्ध व्हायोलिनवादक पंडित अतुलकुमार उपाध्ये, ज्येष्ठ तबलावादक तालयोगी पंडित सुरेश तळवलकर हे गायन-वादन कलेव्दारे पंडित जसराज यांना श्रद्धांजली अर्पण करणार आहेत. तसेच यावेळी डॉ.अश्विनी भिडे-देशपांडे यांच्या शिष्या सानिया पाटणकर, चंद्रशेखर स्वामी आणि पंडित जसराज यांचे शिष्य हेमांग मेहता यांचे शास्त्रीय गायन होणार आहे.
रसिकांना हा संपूर्ण कार्यक्रम (Link: webcast.unipune.ac.in आणि https://www.facebook.com/Lalitkalakendra) या लिंकवर पाहण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहिती ललित कला केंद्राचे विभाग प्रमुख डॉ. प्रवीण भोळे आणि कार्यक्रम संयोजक संवाद, पुणेचे सुनील महाजन यांनी कळविली आहे.