प्रतिनिधी/ निपाणी
केएलई संस्थेचे जी. आय. बागेवाडी महाविद्यालयाची विद्यार्थिनी संगीता मोरे 2018-19 ला बी.एससी. मध्ये 96.87 टक्के गुण मिळवून विद्यापीठात प्रथम क्रमांक प्राप्त केला. याबद्दल कर्नाटकचे राज्यपाल वजुभाई वाला यांच्या हस्ते संगीता मोरे यांना सुवर्णपदक देऊन गौरविण्यात आले. राणी चनमा विद्यापीठाचा आठवा वार्षिक पदवीदान समारंभ बेळगाव येथील सुवर्णसौधच्या सभागृहात झाला. या समारंभाला राज्यपाल वजुभाई वाला अध्यक्ष म्हणून उपस्थित होते.
संगीता यांनी एकूण सात विषयात पैकीच्या पैकी गुण मिळविले आहे. केएलई संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे, केएलई संस्थेचे कार्यकारी सदस्य प्रवीण बागेवाडी, प्रचार्य डॉ. एम. एम. हुरळी, उपप्रचार्य डॉ. आर. जी. खराबे, मराठी विभाग प्रमुख डॉ. एस. एम. रायमाने, डॉ. एस. बी. सोलबनवर, गणित विभागाचे प्रमुख डॉ. संक्रीकोप यांच्यासह प्राध्यापक वर्गाने संगीता मोरे यांचे अभिनंदन केले आहे.