प्रसाद सु. प्रभू / बेळगाव :
एमबीए पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर जर मुलाने घरी सांगितले की मी नोकरी नाही करणार मला ड्रम वाजवायला शिकायचे आहे. तर घरच्यांची प्रतिक्रिया काय झाली असेल? पण त्याच्या पालकांनी याला साथ दिली. आपला निर्णय पक्का करून तो चेन्नईला थेट बडा संगीतकार ए. आर. रेहमानकडे गेला. तेथे ड्रम वाजवायचे, पक्मर्यूशन इन्स्ट्रूमेंटस् वाजवायचे शिक्षण त्याने घेतले. संगीत निर्मिती क्षेत्रात सर्वोत्कृ होण्याचे त्याचे उद्दी आहे. म्हणूनच त्याने ‘मंझील’ हे स्वत:चे संगीत तयार केले आहे. चमकत्या चंदेरी दुनियेत आपल्या बेळगावचा ‘तो’ चमकतोय.
हटके क्षेत्र निवडून तशीच कामगिरी करणाऱया या तरूणाबद्दल वाचायला नक्कीच आवडेल. अनिकेत दीपक हेरंजल असे बेळगावच्या केळकर बागेत राहणाऱया या युवकाचे नाव. वडील बँकेचे निवृत्त कर्मचारी अन् आईचे ब्युटी पार्लर, सर्वसामान्य जीवन. शिक्षण घेतानाच संगीताची आवड जडली. आपल्यासाठी संगीत हेच क्षेत्र हा विचार पक्का केला अन् मागील चार-पाच वर्षांपासून त्याचा प्रवास सुरू झाला.
अनिकेतने आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी ए. आर. रेहमान म्युजिक इन्स्टिटय़ूटमध्ये प्रवेश केला. तेथे त्याचा रेहमान यांच्याशी प्रथम संपर्क आला. या मुलामध्ये काहीतरी आहे याची जाणीव त्यांना झाली. येथूनच ड्रम आर्टीस्ट ते पक्मर्युशन आर्टीस्ट अशी त्याची ओळख निर्माण झाली. तो तज्ञ वादक झाला. मात्र तज्ञ संगीत निर्माता होण्याचे स्वप्न त्याने हाती घेतले. थेट मुंबई गाठली आणि मुंबई म्युझिक इन्स्टिटय़ूटमध्ये ‘साऊंड इंजिनियर व प्रॉडक्शन’चा त्याचा अभ्यास सध्या सुरू आहे.
तीन आगामी चित्रपट आणि दोन म्युझिक चॅनेल्ससाठी तो काम करतोय. ए. आर. रेहमान, प्रितम या हिट संगीतकारांसोबत त्याला संगीत निर्मिती क्षेत्रात कामाची संधी मिळतेय. मंझील हे स्वत:चं संगीत असलेलं गाणंही तो करतोय. टीप्स रीजनल आणि टाईम्स नाऊ म्युजिक या चॅनेल्ससोबत तो जोडला जातोय. संगीत निर्मितीचा अभ्यास पूर्ण झाला की, त्याला बेळगावात येऊन ‘संगीत स्टुडीओ’ बनवायचा आहे. कोणताही अल्बम किंवा चित्रपटही बनवायचा झाल्यास त्याचे काम बेळगावातूनच होईल. याची व्यवस्था त्याला उभी करायची आहे.
जे ध्येय घेतले आहे ते पूर्ण करण्यास ज्यांनी ज्यांनी साथ दिली. त्यांचे अनिकेत आभार मानतोय. कोरोनाने फिल्म आणि म्युझिक इंडस्ट्री त्रासात आहे. पण एक वर्षात सारेकाही सुरळीत होईल. अशी आशा त्याने व्यक्त केली.