बेळगाव : राणी चन्नम्मा विद्यापीठ संचालित संगोळ्ळी रायण्णा प्रथम दर्जा कॉलेजमध्ये इंग्लीश फोरमचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून प्रा. डॉ. कविता कुसुगल तर अध्यक्षस्थानी कॉलेजचे प्राचार्य डॉ. एम. जायाप्पा होते.
प्राचार्य डॉ. एम. जायाप्पा म्हणाले, विद्यार्थ्यांनी सृजनशील लिखाण व संभाषण कौशल्य वाढविण्यासाठी इंग्लीश लिटरेचर फोरमचा लाभ घ्यावा. तसेच इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवावे, असे सांगितले.
प्रा. डॉ. कविता कुसुगल म्हणाल्या, कॉलेजमध्ये सदर फोरमची स्थापना करण्यासाठी प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी बरेच परिश्रम घेतले. पदवी विद्यार्थ्यांनी या फोरममध्ये सहभागी होऊन इंग्रजी साहित्याचा अभ्यास करावा, असे सांगितले.
यावेळी लक्ष्मण नाईक यांनी प्रार्थना सादर केली. स्वागत रितेश हज्जे यांनी केले. अहवाल वाचन सुरेश गंगोत्री यांनी केले. विद्यार्थी शानूर तिगडोळी, फातिमा नालबंद, ऐश्वर्या चौकुळकर व चंद्रिका यांनी मनोगत व्यक्त केले. दीपक लोखंडे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. दीपा हैबत्ती यांनी आभार मानले. यावेळी कॉलेजचा प्राध्यापकवर्ग, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.