प्रतिनिधी/ बेळगाव
राणी चन्नम्मा चौकापासून संगोळ्ळी रायाण्णा मार्गाच्या दुसऱया बाजूच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. हा रस्ता एक महिन्याकरिता बंद राहणार आहे. परिणामी आता पुन्हा एकाच बाजूच्या रस्त्याने वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीच्या समस्येला तोड द्यावे लागत आहे.
स्मार्ट सिटी योजनेंतर्गत शहरातील विविध रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात येत आहे. राणी चन्नम्मा चौक ते संगोळ्ळी रायाण्णा चौक पर्यंतच्या रस्त्याचा विकास करण्यात येत आहे. यापूर्वी रस्त्याच्या एका बाजूचे काँक्रिटीकरण करून रस्ता वाहतुकीस खुला करण्यात आला आहे. तसेच गुरुवारपासून दुसऱया बाजूच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. राणी चन्नम्मा चौक ते संगोळ्ळी रायाण्णा चौक तसेच कोल्हापूर क्रॉसपर्यंतचा रस्ता काँक्रीटचा करण्यात येणार आहे. सदर काम सुरू करण्यात आल्याने रस्त्यावर एका बाजूने वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहे.
एका बाजूचा रस्ता एक महिना वाहतुकीकरिता बंद
संगोळ्ळी रोडला जोडणाऱया न्यायालयामधील आणि चव्हाट गल्ली मराठा मंडळ शाळेशेजारील रस्त्यावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. सदर रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात आल्याने एका बाजूचा रस्ता एक महिना वाहतुकीकरिता बंद राहणार असल्याची माहिती देण्यात आली. सध्या एका बाजूच्या रस्त्याने वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण होत आहे.