वार्ताहर/नेसरी
नेसरीतील दुकान व्यावसायिकांनी संचारबंदी आदेशाचे उल्लंघन करत दुकान सुरू केल्याप्रकरणी दुकानदारांसह एकावर पोलिसांनी कारवाई केली. हर्षद कदम व सिकंदर वाटगी अशी या कारवाई करण्यात आलेल्या व्यावसायिकांची नावे आहेत.
जिल्ह्यात कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने संचारबंदी तसेच अत्यावश्यक सेवा वगळून सर्व दुकाने बंद करणेबाबतचे आदेश देण्यात आले आहेत. असे असताना हर्षद कदम यांनी आपले मोबाईल दुकान तर सिकंदर वाटगी यांनी आपले पत्रावळीचे दुकान उघडून व्यापार करत असताना आढळून आले. तर मधुकर नांदवडेकर हे विनाकारण मास्क न लावता फिरत असताना आढळून आल्याने त्यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायद्या अंतर्गत कारवाई करत पोलीस विकास कांबळे यांच्या फिर्यादीवरून नेसरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचा अधिक तपास पाटील व मोरे करत आहेत.