संत तुकाराम महाराजांचा अभंग गाउन पोलिसांनी केले प्रबोधन..
तरुण भारत संवाद प्रतिनिधी/पंढरपूर
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरीकांना घरात राहण्यांचे आवाहन करण्यात येत आहे. अशातच अनेक नागरिक अद्यापही घराबाहेर येत आहेत. अशा नागरीकांना पंढरपूर पोलिसांनी चक्क संत तुकाराम महाराजांचे अभंग गाउन प्रबोधन केले आहे. इतकेच काय तर कपाळी बुक्का देखील लावला. यावेळी चक्क वारकरी वेशभूषेमधे पोलिस दिसून आले.
पंढरपूरचे पोलिस उपअधिक्षक डॉ. सागर कवडे यांच्या संकल्पनेतून अनोख्या पध्दतीने नागरीकांना घरी राहण्यांचे आवाहन करण्यात आले. यासाठी येथील छ.शिवाजी चौकांमधे पोलिसांनी बाहेर फिरणा-या नागरीकांना अडवले. यावेळी वारकरी वेशामधे असणा-या पोलिस कॉस्टेबल प्रसाद औटी यांनी संत तुकाराम महाराजांचा अभंग आणि हरिपाठातील काही ओव्या देखील याप्रसंगी म्हटल्या. यावेळा पोलीस कॉस्टेबल रणजित पाटील तसेच अभिजीत कांबळे यांनी वारकरी वेशभूषा परिधान केली होती.
विशेष म्हणजे सदरचे अभंग गायन सुरू असताना काही वारकरी वेशातील पोलिसांनी बाहेर फिरणा-या नागरीकांच्या ललाटी विठुरायांचा बुक्का लावला. तर नागरीकांना सुगंधी दुधांचे देखील यावेळी वाटप करण्यात आले. यानंतर पोलिस उपअधिक्षक डॉ कवडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
यामधे सध्या किराणा, औषधे तसेच इतर जीवनावश्यक वस्तू घरपोच मिळत आहे. त्यामुळे नागरीकांनी घरी राहूनच विठोबाचे नामस्मरण करा आणि कोरोनाला हटविण्यासाठींची प्रार्थना करा असे आवाहन यावेळी पोलिसांच्यावतीने करण्यात आले.
सध्या लोकांना घराबाहेर पडू नका. यासाठी पोलिसांकडून वेगेगळे प्रयत्न होत आहेत. यामधे प्रामुख्याने सोशल मिडीयावरील व्हायरल व्हिडीओमधे कुठे नागरीकांची आरती केली जात आहे. तर गांधीगिरी करीत नागरीकांना फूल दिले जात आहे. याशिवाय देशभक्तीपर गीते देखिल पोलिस गात आहेत. यामधेच आता पंढरपूर पोलिसांनी विठुरायांच्या वारकरी सांप्रदायाच्या शिकवणीतून चक्क नागरीकांना घरी राहण्यांचे प्रबोधन केले आहे.