सोलये खनिज खाणीवरील काम स्थानिकांनी बंद पाडले : पिसुर्ले, होंडा औद्योगिक वसाहतीतील अनेक प्रकल्प सुरू
वाळपई / प्रतिनिधी
गोवा सरकारने जारी केलेल्या तीन दिवस संचारबंदीच्या पहिल्याच दिवशी सत्तरी तालुक्मयात शंभर टक्के प्रतिसाद लाभला .
होंडा व पिसुर्ले औद्योगिक वसाहतींमधील कंपन्या सोडल्यास इतर ठिकाणी सर्व प्रकारचे व्यवहार बंद होते. यामुळे या भागांमध्ये 100ज्ञ् नागरिकांचा प्रतिसाद लाभल्याचे चित्र पहावयास मिळाले .
मात्र सत्तरी तालुक्मयातील होंडा पंचायत क्षेत्रातील सोलये येथील खनिज खाणीवर सुरू असलेले काम संतप्त नागरिकांनी बंद पाडण्याचा प्रयत्न केल्याची माहिती हाती आली आहे.
गोव्यामध्ये कोरोना रोगाची महामारी नियंत्रणात यावी यासाठी गोवा सरकारने तीन दिवस संचारबंदी लागू केलेली आहे. याचा आज पहिला दिवस होता. गुरुवारी संध्याकाळी गोवा सरकारच्या वेगवेगळे यंत्रणेमार्फत या संदर्भाची माहिती वेगवेगळे दुकानदार व नागरिकांना देण्यात आली होती. यामुळे जीवनावश्यक दुकाने सोडल्यास इतरांनी दुकाने उघडून नयेत व नागरिकांनी अनावश्यक घराबाहेर पडू नये अशा प्रकारचे आवाहन करण्यात आले होते. त्याला आज शंभर टक्के प्रतिसाद मिळाल्याचे चित्र पहावयास मिळाले. शहरांमध्ये औषध विक्री वगळता इतर स्वरूपाची सर्व आस्थापने बंद होती. गोवा स्टेट को-ऑपरेटिव बँक व राष्ट्रीय बँकांच्या शाखा सुरू होत्या. मात्र ग्राहकाभावी त्यांचा व्यवसायही पूर्णपणे ठप्प झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले. वाळपई ही सत्तरी तालुक्मयाची प्रमुख बाजारपेठ असल्यामुळे सातत्याने याठिकाणी वर्दळ असते. आज मात्र संपूर्ण परिसरामध्ये शांतता पसरल्याचे चित्र पहावयास मिळाले. त्याचप्रमाणे सत्तरी तालुक्मयातील होंडा केरी आदी भागात संचारबंदीला चांगल्या प्रकारे प्रतिसाद लाभल्याचे चित्र पहावयास मिळाले. भागातील दुकानदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार सरकारच्या आवाहनाला अनुसरून या भागातील सर्व बाजारपेठ बंद करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले.
केरी भागांत चांगला प्रतिसाद.
त्याचप्रमाणे केरी भागातही संचारबंदीला चांगल्या प्रकारचा प्रतिसाद लाभला. सदर भागातील दुकानदाराकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार सरकारच्या आवाहनाला अनुसरून या भागातील सर्व आस्थापने पूर्णपणे बंद करण्यात आले होती. सरपंच गोविंद गावस यांच्याकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार या भागातील सर्व दुकाने पूर्णपणे बंद करण्यात आली होती. नागरिकांनी सुद्धा घराबाहेर न पडण्याचा घेतलेला निर्णय खरोखरच स्वागतार्ह असून यामुळे या भागात संचारबंदीला शंभर टक्के प्रतिसाद लाभल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान पोलिस स्थानकाचे निरीक्षक सागर एकोस्कर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की सत्तरी तालुक्मयात शंभर टक्के प्रतिसाद लाभल्याचे स्पष्ट केले. गुरुवारी मध्यरात्रीपासून सत्तरी तालुक्मयाच्या वेगवेगळय़ा ठिकाणी मोठय़ा प्रमाणात पोलिस तैनात करण्यात आली होती. शहरांमध्ये अनेक ठिकाणी पोलीस बंदोबस्त जारी करण्यात आला होता. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर न पडण्याचे धाडस केले. डिचोली उपाधिक्षक गुरुदास गावडे यांनी सत्तरी तालुक्मयात वेगवेगळय़ा भागांमध्ये फिरून एकूण परिस्थितीचा आढावा घेतला..
दरम्यान यासंदर्भात अधिक माहिती देताना निरीक्षक सागर एकोस्कत यांनी सांगितले की होंडा व पिसुर्ले औद्योगिक वसाहतीत असलेले अनेक कारखाने आज सुरू होते. सरकारने याकारखान्यासाठी परवानगी दिली होती. तरीसुद्धा सदर भागांमध्ये सुरक्षेसंदर्भात विशेष लक्ष देण्यात आले होते. त्याचप्रमाणे वाळपई पोलीस स्थानकाच्या यंत्रणांनी वेगवेगळय़ा ठिकाणी फिरून एकूण परिस्थितीचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला. नागरिकांनी दिलेल्या सहकार्याप्रमाणेच इतर दोन दिवस चांगल्या प्रकारचे सहकार्य द्यावे अशा प्रकारचे आवाहन निरीक्षक सागर एकोस्कर यांनी केले आहे.