प्रतिनिधी /पणजी
अग्निशामक दलाच्या संचालक पदाचा ताबा उपसंचालक नितीन रायकर यांच्याकडे देण्यात आल्याचा आदेश जारी करण्यात आला आहे. अशोक मेनन निवृत्त झाले असल्याने संचालक पद रिक्त झाले होते. पुढील आदेश जारी होईपर्यं रायकर यांच्याकडे संचालक पदाचा ताबा राहिल असे आदेशात म्हटले आहे.