लॉकडाऊनमुळे गेले एक वर्ष कार्यक्रम आणि सोहळे बंद झाल्याने मराठी सिनेसफष्टीची झळाळीच गेल्यासारखे झाले होते. पण अकरा महिन्यांनंतर सिनेसफष्टीची ही झळाळी परतलीय. संजय जाधव ह्यांच्या फिल्मॅजिक ह्या फिल्म स्कुलच्या उद्घाटनाला सिनेसफष्टीतल्या मोठल्ल्मोठय़ा सुपरस्टार्सनी उपस्थिती लावली.
सई ताम्हणकर, स्वप्निल जोशी, तेजस्विनी पंडित, अंकुश चौधरी, मानसी साळवी, उमेश कामत, सोनाली खरे, सिध्दार्थ जाधव, श्रेया बुगडे, संजय नार्वेकर ह्या सुपरस्टार्ससोबतच नफत्यदिग्दर्शक उमेश जाधव, संगीतकार अमितराज आणि पंकज पडघन, फिल्ममेकर विजु माने, अभिजीत पानसे, केदार शिंदे अशा सेलिब्रिटींची मांदियाळी फिल्मॅजिक स्कुलच्या उद्घाटनाला दिसून आली. संजय जाधव ह्यांचे गुरू आणि ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगांवकर ह्यांच्या हस्ते फिल्मॅजिक फिल्म स्कुलचे उद्घाटन झाले. ह्यावेळी संजय जाधव ह्यांना शुभेच्छा देताना सचिन पिळगावकर म्हणाले, संजयची वाटचाल मी खूप अगोदरपासून पाहत आलोय. त्याने अतिशय मेहनतीनं आपलं करीयर घडवलंय. त्याचं नेतफत्व फिल्मॅजिक स्कुलच्या विद्यर्थ्यांचं करीयर घडवायला नक्कीच उपयोगी पडेल.
फिल्मॅजिकच्या स्थापनेविषयी संजय जाधव म्हणाले,सिनेमाच्या मुख्य धारेत समाविष्ट होताना फिल्मसेटवर वापरली जाणारी भाषा, वावरायची पध्दत अशा अनेक गोष्टी नवोदिताला शिकाव्या लागतात. सिनेसफष्टीत पाऊल ठेवताना इथला माहौल पाहून अनेकांना भांबावायला होतं. मी स्वानुभवाने शिकत गेलो. पण नव्या पिढीला आत्मविश्वासाने आपली वाटचाल करता यावी, म्हणुन माझ्या आणि सिनेसफष्टीतल्या नावाजलेल्या तंत्रज्ञांच्या अनुभवाची शिदोरी आम्ही फिल्मॅजिकमधून विद्यार्थ्यांना देऊ इच्छितो. फिल्मॅजिक फिल्म स्कुलचे वैशिष्ठय़ आहे की, इथे प्रवेशासाठी कोणत्याही वयाची, शैक्षणिक पात्रतेची किंवा भाषेची बंधन नाहीत.
अभिनेत्री सई ताम्हणकर म्हणाली, महाराष्ट्रीयन फिल्ममेकरने अशा पध्दतीने एक फिल्म स्कुल सुरू करण्याचा विचार करावा ह्याचं मला कौतुक वाटतंय. आणि आता महाराष्ट्रातल्या कानाकोपल्ल्यातल्या विद्यार्थ्यांना संजयदादाच्या फिल्ममेकिंगच्या अनुभवाचा लाभ होईल, ह्याचा मला अभिमान आहे. अभिनेता अंकुश चौधरी म्हणाला, संजय जाधवसोबत माझं नातं आभाळमाया मालिकेपासूनचं आहे. तेव्हापासून आजपर्यंत मी त्याच्याकडून शिकतोच आहे. प्रत्येक मालिका, फिल्मगणिक मी खूप शिकत गेलो. जसं मला खूप शिकता आलं, ती संधी फिल्मॅजिकमूळे इथल्या विद्यार्थ्यांना मिळेल, असं मला वाटतं. अभिनेत्री तेजस्विनी पंडित म्हणाली, जेव्हा आम्ही ह्या क्षेत्रात आलो, तेव्हा आम्हांला सिनेतंत्राविषयी माहिती करून देणाल्ल्या अशा कोणत्या इन्स्टिटय़ूट नव्हत्या. आजकालच्या नवोदितांना फिल्मॅजिक सारख्या फिल्म स्कुल मिळतायत. तर ह्या संधीचा त्यांनी पूरेपूर फायदा घ्यावा असं मला वाटतं. आम्हांला जर संजयदादासारखे मेन्टॉर करीयरच्या सुरूवातीला मिळाले असते, तर आजपेक्षा निम्म्या कालावधीतच करीयरमध्ये यश संपादन करता आले असते.