ऑनलाईन टीम / मुंबई :
मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी राज्य सुरक्षा महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक संजय पांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नगराळे आता राज्य सुरक्षा महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम पाहतील.
संजय पांडे हे 1986 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. पुण्यात सहायक पोलीस आयुक्त म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली होती. मुंबई पोलीस आयुक्तपदावरुन परमबीर सिंह यांची होमगार्डच्या प्रमुखपदी वर्णी लागल्याने संजय पांडे यांना तुलनेने कमी महत्त्वाच्या असणाऱया राज्य सुरक्षा महामंडळाच्या प्रमुखपदी नेमण्यात आले, त्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. संजय पांडे यांच्या नाराजीनंतर त्यांना महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक पदावर नियुक्ती देण्यात आली होती. त्यामुळे पांडे यांनी 21 मे 2021 रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना यासंदर्भातलं पत्र लिहिलं होतं. पोलीस महासंचालकपद किंवा मुंबई पोलीस आयुक्तपद रिक्त झाले असतानाही संधी देण्यात आली नाही. याउलट माझ्या कनि÷ अधिकाऱयाला ते पद देण्यात आले, अशी खंत पांडे यांनी व्यक्त केली होती.