ऑनलाइन टीम / मुंबई :
इंदिरा गांधी-करीम लाला भेटीच्या वक्तव्यावर संजय राऊत यांनी माघार घेतली आहे. ते म्हणाले, ज्यांना मुंबईचा इतिहास माहित नाही अशांनी माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला. मी जे वक्तव्य केलं त्यामधून इंदिरा गांधी यांचा अनादार केला असं कुणाला वाटत असेल तर मी माझं वक्तव्य मागे घेतो, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, काल पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमात राऊत म्हणाले होते की, ‘माजी पंतप्रधन इंदिरा गांधी ह्या कुख्यात गुंड करिमा लाला याला भेटायला आल्या होत्या’. मात्र या वक्तव्यावरून वादाला तोंड फुटले होते. अखेरीस आज मी केलेल्या वक्तव्यामुळे इंदिरा गांधींच्या प्रतिमेस धक्का लागला आहे असे वाटत असेल तर, तसेच त्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी वक्तव्य मागे घेतो, असं राऊत म्हणाले.