गोडोली / प्रतिनिधी
सहा.मोटार निरिक्षक ते उप प्रादेशिक परिवहन अधिकारी असा प्रवास करणाऱ्या कर्तव्यदक्ष अधिकारी असा लौकिक संजय राऊत यांनी मिळवला. त्यांच्या प्रादेशिक परिवहन विभागातील तब्बल ३७ वर्षाच्या नोकरीनंतर दि.३१ आँक्टोंबर रोजी ते सेवानिवृत्त होत आहेत. यानिमित्ताने सातारच्या उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात कर्तव्यपुर्ती सोळहा आयोजित करून संजय राऊत आणि त्यांच्या पत्नी निलीम राऊत यांचा गौरव सोहळा गुरुवारी सायंकाळी ६ ते रात्री९:३० यावेळी संपन्न झाला.
यावेळी कोल्हापूरचे प्रादेशिक परिवहन अधिकारी एस.टी.अलवारीय,माजी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अशोक शिंदे, प्रमोद कुलकर्णी, सांगलीचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विलास कांबळे,डॉ. संजोग कदम, डॉ. भास्कर यादव, बाळासाहेब कलशेट्टी, प्रकाश गवळी,निळकंठ पाटील, क्षितीज राऊत, मोटार वाहन निरिक्षण बालाजी धनवे,संदीप मुरकुटे, चंद्रकांत माने यांच्या सह राज्यभरातून अनेक अधिकारी, मान्यवर या सोहळ्याला उपस्थित होते.
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत यांच्याबद्दल अनेकांनी मनोगत व्यक्त केली.त्यातून व्यासंगी,खेळाडू,कलाकार, संगीतप्रेमी, नाविन्यपूर्ण उपक्रमशील,कार्यालयात परिपूर्ण कामकाजात माहिर, सहकार्याशी स्नेह वाढवून काम करण्याची पध्दत, कुटुंब वत्सल असे अनेक पैलू असलेले संजय राऊत यांच्या व्यक्तिमत्त्वाचे उलगडले. एका कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांच्या सेवानिवृत्तीवेळी एक दैदीप्यमान असा गौरव सोहळा साताऱ्यात मोठ्या उत्साहात पार पडला.
यावेळी “तरुण भारत” ने संजय राऊत यांच्या जीवनकार्याचा आढावा घेणारे “कर्तव्य दक्ष अधिकारी” म्हणून दि.२९ रोजीच्या अंकात पान प्रसिद्ध केले. त्याचे अनावर मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.