ऑनलाईन टीम / मुंबई :
शिवसेना खासदार संजय राउत यांच्या पत्नी वर्षा राउत यांना कोरोनाची लागण झाली आहे. वर्षा राउत यांना मागील 2 दिवसांपासून ताप आणि सर्दी-खोकल्याची लक्षणे दिसून येत होती. कोरोनाची लक्षणे दिसून आल्यानंतर त्यांनी चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली आहे.
वर्षा यांना फोर्टीस रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सोबतच, संजय राऊत यांनीही कोरोनाची चाचणी केली असून राऊत यांची ही कोरोना चाचणी केली जाणार आहे.
दरम्यान, संजय राऊत यांच्या घरात कोरोनाचा शिरकाव झाल्याने पवार कुटुंबियांसाठी चिंता वाढली आहे. कारण शरद पवार यांच्यावर शस्त्रक्रियेनंतर त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी संजय राऊत यांनी ब्रीच कँडी रुग्णालय गाठले होते. त्यानंतर आता राऊत यांच्या पत्नी वर्षा यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे आता संजय राऊत यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल काय येतो, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.