प्रतिनिधी /पणजी
मनसा क्रिएशन्स आणि आम्ही विश्व लेखिका गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दि. 28 रोजी संध्याकाळी 5 वाजता महाराष्ट्रातील ज्ये÷ साहित्यिक, शिक्षणतज्ञ , कवयित्री संजीवनीताई बोकील यांच्या अध्यक्षतेखाली “ललित लेखन उपक्रम” होणार आहे. हा कार्यक्रम गुगल मीटवर होणार असून साहित्यप्रेमींना प्ttज्sः//सू.gददुत.म्दस्/ंम्t-zsgप्-rंg या लिंकवरून या कार्यक्रमाचा आस्वाद घेता येईल.
डॉ . शिल्पा डुबळे परब , तेजश्री प्रभु गांवकर, आसावरी कुलकर्णी, सोनाली देसाई , मेघना कुरुंदवाडकर, केतकी साळकर, रजनी अरूण रायकर, शर्मिला प्रभू, अपूर्वा कर्पे, अमिता देसाई, नम्रता नाडकर्णी सालेलकर, रेखा मिरजकर, मीरा प्रभू वेर्लेकर, दीपा मिरिंगकर, सृष्टि नाईक, प्रज्ञा सालेलकर, स्मिता सालेलकर, इंदू लक्ष्मण परब, वंदन नायक, माधुरी उसगावकर, कविता बोरकर, डा?.आरती दिनकर, मंदा सुगिरे, स्मिता कारो, डा?. स्नेहा सुवास प्रभु महांबरे, गौरी कुलकर्णी, पौर्णिमा केरकर, सुनेत्रा कळंगूटकर, गुलाब वेर्णेकर, अक्षता किनळकर, सुरेखा देसाई या लेखिका या कार्यक्रमात सहभागी होऊन आपले लेख सादर करणार आहेत. आम्ही विश्व लेखिका समूहाच्या अध्यक्ष प्रा. पद्माताई हुशिंग आणि उपाध्यक्ष प्रा.विजयाताई मारोतकर यांची या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती असेल.
साहित्यप्रेमींनी अवर्जून या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे असे आम्ही विश्व लेखिका गोवा शाखेच्या अध्यक्ष कालिका बापट यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.