बेळगाव / प्रतिनिधी
नैर्त्रुत्य रेल्वेच्या नूतन महाव्यवस्थापकपदी संजीव किशोर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी यापूर्वी अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱया सांभाळल्या आहेत.
ए. के. सिंग यांच्या निवृत्तीनंतर गजानन मल्ल्या हे महाव्यवस्थापक म्हणून कार्यभार सांभाळत होते. त्यानंतर आता संजीव किशोर यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यांनी रेल्वे कोच फॅक्टरी, मध्य रेल्वे, आग्नेय रेल्वे, आरआयटीईएस, सीओएफएमओडब्लू, दिल्ली येथील रेल्वेचे मुख्यालय यासह विविध ठिकाणी सेवा बजावली आहे.