वार्ताहर /किणये
संतिबस्तवाड येथील बसवेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात येणार आहे. या मंदिराचा कॉलम भरणी कार्यक्रम नुकताच पार पडला. तारीहाळ येथील बडेकोळमठाचे मठाधिश नागय्या स्वामी यांच्या हस्ते विधीवत पूजा अर्चा करून कॉलम भरणी कामाचा शुभारंभ करण्यात आला.
गावातील जागृत बसवेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराचे कामकाज सुरु असल्यामुळे नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामीणचे आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या विशेष प्रयत्नातून आमदार फंडातून या मंदिरासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. कॉलम भरणी कार्यक्रमाला देवस्थान कमिटी व गावकरी उपस्थित होते.