किणये : संतिबस्तवाड येथील तालीम कट्टा आयोजित फुल्लपीच क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन थाटात करण्यात आले. नावगे क्रॉस, संतिबस्तवाड येथील पटांगणावर या स्पर्धा सुरू आहेत.
स्पर्धेचे उद्घाटन ओमाण्णा बस्तवाडकर, रवी कोकितकर, राजवीर मजुकर, राजेश पाटील, भरमा गुडुमकेरी, निंगाप्पा बुड्डी, अजय चिन्नीकोप्पी आदींच्या हस्ते करण्यात आले. नागय्या पुजारी, बसाप्पा खानापुरी, सहदेव चौगुले, शिवाजी बस्तवाडकर आदींच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.