प्रतिनिधी / बेळगाव
वडगाव, विष्णू गल्ली, यरमाळ रोड येथील संत निवृत्तीनाथ वारकरी सोसायटीचा तिळगूळ समारंभ नुकताच पार पडला. प्रमुख पाहुण्या म्हणून विद्या हंगिरगेकर उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. लक्ष्मी काकतीकर यांनी पाहुण्यांचा सत्कार केला. विश्रांती अष्टेकर यांचा सत्कार नर्मदा बोंगाळे यांनी तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष नागेंद्र भारती यांचा सत्कार नारायण मोरे यांनी केला.
पाहुण्यांच्या भाषणानंतर नागेंद्र भारती यांनी तुळशींच्या रोपांचे व तिळगूळ समारंभाचे महत्त्व सांगितले. व्हा. चेअरमन रमेश कडगावकर यांनी आभार मानले. सर्व महिलांना तुळशीचे रोप वाण म्हणून देण्यात आले. याप्रसंगी हभप मनोहर पाटुकले, परशराम कुरंगी, सिद्राय मादाकाचे, वैजनाथ उच्चुकर, शामल पाटील, पद्मजा येळ्ळूरकर, सरस्वती खोराटे उपस्थित होते.