बेंगळूर/प्रतिनिधी
मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्या हस्ते संत बसवेश्वर पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. पूर्वी येथे फक्त पुतळा होता. त्यामुळे येथून जाणारा प्रत्येकजण हा पुतळा कोणाचे आहे हे विचारत असत. कारण बसवण्णा यांच्याबद्दल काहीच वर्णन नव्हते. हे लक्षात घेऊन पुतळ्याभोवती बसवण्णा यांच्याबद्दल सर्व तपशील देण्यात आला आहे. तसेच या ठिकाणी येथे एक छोटी बाग देखील बांधली गेली आहे.
या कामासाठी नगराध्यक्षांच्या निधीतून १.५० कोटी रुपये खर्चझाले आहेत. पुतळ्याच्या मागे नवीन डिझाईनचे कंपाउंड बांधले आहे. या कांस्य पुतळ्याला एक विशिष्ट चांदीचा रंग दिला आहे. संध्याकाळी अत्याधुनिक आणि स्वयंचलित रंगाचे दिवे व संगीताची व्यवस्था करण्यात आली आहे. बागेत अनेक प्रजातीची झाडे लावली आहेत. तसेच पुतळ्याभोवती फुटपाथ बांधला आहे. या जागेला पर्यटनस्थळाचा दर्जा देण्यात आला आहे.