फोंडय़ातून स्वतंत्र लढणार
प्रतिनिधी/ फोंडा
भाजपाचे फोंडय़ातील ज्येष्ठ कार्यकर्ते व राज्य कार्यकारिणी सदस्य संदीप खांडेपारकर यांनी भाजपाचा राजीनामा दिला आहे. फोंडा मतदार संघातून उमेदवारी नाकारली गेल्याने त्यांनी हा निर्णय घेतला असून ते स्वतंत्र उमेदवार म्हणून लढणार आहेत.
खांडेपारकर यांनी काल शनिवारी भाजपाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. गेली 22 वर्षे ते भाजपामध्ये सक्रीय होते. प्रदेश भाजप कार्यकारीणी बरोबरच विविध पदांवर त्यांनी काम केले आहे. सन 2007 मध्ये फोंडय़ातून भाजपचे उमेदवार म्हणून त्यांनी निवडणूक लढविली होती. त्यानंतर सन 2012 व 2017 मध्ये आपला उमेदवारीवर प्रबळ दावा होता. मात्र मनोहर पर्रीकर यांनी 2022 च्या निवडणुकीत उमेदवारी देण्याचे शब्द दिल्याने आपण दोनवेळा माघार घेतली. यावेळी पक्षाने आपला अधिकार नाकारल्याने आपण राजीनामा देऊन पक्षाविरोधात स्वतंत्र लढणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. संदीप खांडेपारकर हे कुर्टी-खांडेपार पंचायतीचे माजी सरपंच असून सामाजिक क्षेत्रात त्यांचा वावर आहे.