मुंबईसह राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्या झपाटय़ाने वाढत आहे. अशात पुन्हा लॉकडाऊनच्या चर्चांना उधाण आले आहे. यात शाळा-कॉजेल बंद करण्यात आले. त्यामुळे मुंबई लोकलवरही निर्बंध लागू होणार, अशी शक्यता वर्तवली जात आहे. यात सर्व गोष्टींवर निर्बंध लागू झाल्यास मनोरंजन विश्वही निर्बंधांत अडकेल, असे बोलले जात आहे. कोरोना महामारीनंतर जवळपास दोन वर्षांनी नाटय़गृहे, चित्रपट गृह सुरु झाले आहेत. मात्र कोरोनाचा वाढत्या संसर्गामुळे पुन्हा लागू होणाऱया निर्बंधांचा फटका कलाकारांना सहन करावा लागणार आहे. याच निर्बंधांवर आता मराठी अभिनेता संदीप पाठक याने संताप व्यक्त केला आहे. याबाबत संदीपने ट्वीट केले असून, त्याची चर्चा सोशल मीडियावर मोठय़ा प्रमाणात आहे.अभिनेता संदीप पाठक याचे ‘वऱहाड निघाले लंडन’ला या नाटकाचे प्रयोग राज्यभरात सुरु आहेत. मात्र कोरोना संसर्ग वाढल्याने नाटय़गृहे फक्त 50 टक्के क्षमतेने सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे, ज्यामुळे बहुतांश राज्यात नाटकाचे प्रयोग रद्द होत आहेत. कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी या ठिकाणचे ‘वऱहाड निघाले लंडन’ला नाटकाचे प्रयोग रद्द झाले आहे. यामुळे पुन्हा याचा आर्थिक फटका मनोरंजन विश्वाला सहन करावा लागणार आहे. यामुळे सरकारच्या कोरोना निर्बंधांवर आणि निवडणुकांवर संदीपने टीका केली आहे. क्षमस्व असं पहिले ट्वीट संदीप पाठकने केले आहे. यानंतर लगेच दुसरे ट्वीट करत त्याने तिसऱया लाटेच्या पार्श्वभूमीवर लादण्यात येणाऱया निर्बंधांवर तीव्र संताप व्यक्त केला. निवडणूक काळात कोरोनाचा कोणता नवा व्हेरिएंट येईल? की निकाल लागेपर्यंत कोरोनाचे व्हेरिएंट लपून बसतील? माझ्या बालमनाला पडलेला हा प्रश्न आहे. मास्क वापरण्याचा निर्णय आम्हा सामान्यांकरिता, सामाजिक अंतर राखण्याचा नियमही आम्हा सामान्यांकरिता असं ट्वीट त्याने केले आहे. दरम्यान, संदीप पाठकने केलेल्या या दोन्ही ट्वीटवर अनेकांकडून प्रतिक्रिया येत आहे.
Previous Articleरॉस टेलरच्या कारकिर्दीची विजयाने सांगता
Next Article सरकार व्होडाफोन-आयडियामधील 35 टक्के हिस्सेदारी घेणार
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.