दोघांचीही संपत्ती 6.63 लाख कोटी रुपयावर
वृत्तसंस्था /मुंबई
अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी आता संपत्तीच्या विषयामध्ये बरोबरीत आले आहेत. दोघांची संपत्ती ही प्रत्येकी 6.63 लाख कोटी रुपयांची राहिली असल्याची माहिती आहे. डॉलरच्या तुलनेत हा आकडा 89 अब्ज डॉलर होतो. आशियामध्ये दोघेही प्रसिद्ध व्यावसायिक म्हणून ओळखले जात आहेत.
चालू आठवडय़ामधील बुधवारी अदानी समूहाच्या फर्मचे एकूण बाजारमूल्य 10 लाख कोटी रुपयावर पोहोचले होते, त्याच दरम्यान रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजारमूल्य 14.91 लाख कोटी रुपयावर राहिले होते. बाजारमूल्याच्या तुलनेत रिलायन्स पुढे आहेत. गौतम अदानी यांनी आपल्या कंपन्यांमधील हिस्सेदारी रिलायन्स समूहातील कंपनीमध्ये अंबानी यांच्या हिस्सेदारीच्या तुलनेत अधिक ठेवली असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळेच एकाच दिवसात अदानी अंबानी यांच्यापेक्षा श्रीमंत बनले आहेत. परंतु सध्या दोघेही संपत्तीत बरोबरीत आहेत.
रिलायन्सचे समभाग प्रभावीत
सौदी अमराम्को सोबत 15 अब्ज डॉलरचा व्यवहार पूर्ण न झाल्यामुळे रिलायन्सचे समभाग सलगपणे घसरणीत राहिल्याचे दिसून आले आहे. याच घसरणीमुळे बुधवारी बीएसईवर रिलायन्सचे समभाग 1.48 टक्क्यांनी घसरुन 2,350.90 रुपयावर बंद झाले आहेत. याचा परिणाम हा अंबानी यांच्या संपत्तीमध्ये फरक पडण्यासाठी कारणीभूत ठरला असल्याचे अभ्यासकांचे मत आहे.
रिलायन्स बाजारमूल्यात अव्वल
रिलायन्सच्या समभागात घसरण झाल्यानंतरही कंपनीचे बाजारमूल्य 14.91 लाख कोटी रुपयावर आले आहे. परंतु आजही भारतामधील सर्वात मौल्यवान फर्म म्हणून कार्यरत आहे. लिस्टेड कंपनी रिलायन्स इंडस्ट्री इंन्फ्रास्ट्रक्चरचा समभाग हा 1.57 टक्क्यांनी घसरुन 613.85 रुपयावर आला आहे. या घसरणीसोबतही बाजारमूल्य 926.91 कोटी रुपयावर आले आहे.
अदानी यांचे बाजारमूल्य
अदानी समूह फर्मचे बुधवारी ग्रॉस बाजारमूल्य 12,000 कोटी रुपये आणि निव्वळ बाजारमूल्य 4,250 कोटी रुपयांनी वाढले आहे. बुधवारी अदानी एन्टरप्राईजेसचे समभाग 2.76 टक्के वधारत 1754.65 रुपयावर बंद झाला आहे.
अदानी यांची अधिकची हिस्सेदारी
मुकेश अंबानी यांची रिलायन्स इंडस्ट्रीजमधील हिस्सेदारी 50.61 टक्के आहे. तर दुसरीकडे गौतम अदानी यांची हिस्सेदारी त्यांच्या कंपन्यांमध्ये 70.59 टक्के असून तीन कंपन्यांमधील त्यांचा हिस्सा हा 74.92 टक्के आहे. म्हणजे एका कंपनीमध्ये 74.80 टक्के आणि दोन कंपन्यांमध्ये हा टक्का 60-64 टक्के आहे.