खाणीसह कार्यालयातील कंपनीतील कर्मचाऱयांचा समावेश
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सार्वजनिक मालकी असणाऱया उपक्रमांपैकी सेल, आरआयएनएल आणि एनएमडीसी कंपनीच्या जवळपास 35,000 कर्मचाऱयांनी देशव्यापी संप पुकारल्यामुळे व सलग दुसऱया दिवशीही कर्मचारी कामावर परतले नसल्याने सदरच्या कंपन्यांमधील उत्पादन प्रक्रिया प्रभावीत झाली आहे.
एनएमडीसीचे संयुक्त खाण मजदूर संघाचे सचिव राजेश संधू यांनी म्हटले आहे, की बिगर कार्यकारी स्तरावरील सर्व कर्मचाऱयांनी संपामध्ये सहभाग घेत कामावर बहिष्कार टाकला आहे. यामुळे दोन दिवसांच्या कालावधीत जवळपास 200 कोटी रुपयांचे नुकसान होणार असल्याचा अंदाज आहे.
लोह खनिज खाण कंपनी एनएमडीसीचे मध्यप्रदेश, छत्तीसगढ, आंध्रप्रदेश, कर्नाटक आणि तेलंगना येथील खाण व कार्यालयात रुजू असणारे जवळपास 10,000 पेक्षा अधिकचे कर्मचारी संपामध्ये सहभागी झाले होते. यासह पोलाद प्रकल्पातील कर्मचारी संघाचे अध्यक्ष जे अयोध्या राम यांनी म्हटले आहे, की आरआयएनएलच्या विशाखापट्टणम प्रकल्पातील कर्मचारी कामावर न आल्याने उत्पादन अधिक प्रमाणात प्रभावीत झाले आहे.