प्रतिनिधी / कोल्हापूर
संभाजी बिग्रेडची नूतन राज्य कार्यकारिणी करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर संभाजी बिग्रेडच्या कार्यकारिणीमध्ये काम करण्यासाठी इच्छुकांच्या मंगळवारी कोल्हापुरात मुलाखती घेण्यात आल्या.या मुलाखतींना भरघोस प्रतिसाद मिळाला.
संभाजी ब्रिगेड ची नवीन कार्यकारणी करण्यासाठी ब्रिगेडचे निरीक्षक संतोष गाजरे यांनी राज्यभर दौरा आयोजित केला आहे. मंगळवारी गाजरे कोल्हापुरात आले होते. यावेळी मुलाखतीसाठी कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. संभाजी ब्रिगेड चे निरीक्षक संतोष गाजरे, अण्णासाहेब सावंत, सुहास राणी, योगेश पाटील यांनी मुलाखती घेतल्या.
कोल्हापूर जिल्हाअध्यक्ष पदासाठी चार उमेदवारांनी मुलाखती दिल्या. कोल्हापूर महानगर अध्यक्षपदासाठी चार जणांनी मुलाखती दिल्या. मुलाखत व निवड प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक असून निरीक्षक अहवाल तयार करून प्रदेश कार्यकारणी कडे पाठवणार आहेत. यानंतर योग्य उमेदवाराची निवड करण्यात येणार आहे असे यावेळी सांगण्यात आले. संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष ऍड. मनोज आखरे, हे मुंबई येथून 12 मार्च रोजी सर्व राज्यातील निवडी जाहीर करणार आहेत. राज्य कार्यकारिणी सह विभाग व जिल्हा कार्यकारिणी नव्याने करण्यात येणार आहे.
मुलाखतीसाठी करवीर ,कागल राधानगरी, चंदगड, हातकणंगले, शिरोळ, गडिंग्लज या तालुक्यातील पदाधिकारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. यावेळी मनोज गायकवाड, संदीप भारुड, रुपेश पाटील, भगवान कोईगडे ,संभाजी नलगे, रणजीत देवणे , प्रगती चव्हाण , विकी जाधव, विकास पाटील ,राहुल पाटील उपस्थित होते.