प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव जिल्हा शिवसेनेच्यावतीने धर्मवीर संभाजी महाराज चौक येथील संभाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. फाल्गुन शुक्ल प्रतिपदेपासून अमावास्येपर्यंत बलिदान मास आचरण्यात येतो.
शहर उपप्रमुख राजू तुडयेकर यांच्या हस्ते संभाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. यावेळी जिल्हा उपप्रमुख बंडू केरवाडकर, शहर प्रमुख दिलीप बैलूरकर, प्रकाश राऊत, प्रदीप सुतार, सुनील देसूरकर, प्रवीण तेजम, राजू कणेरी, राजकुमार बोकडे यांच्यासह शिवभक्त उपस्थित होते.