प्रतिनिधी / बेळगाव
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त धर्मवीर संभाजी चौकात भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्यावतीने शनिवारी अभिवादन करण्यात आले.
भाजप नेते व कर्नाटक राज्य ओबीसी मोर्चाचे सचिव किरण जाधव यांच्या हस्ते धर्मवीर संभाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले.
यावेळी संतोष पेडणेकर, रमेश पाटील, विनायक मुचंडीकर, शिवू बालाजी, राघवेंद्र पाटील, राजन जाधव, भूषण पाटील, मयूर जाधव, मिलिंद कदम यासह कार्यकर्ते उपस्थित होते.