मस्कत/ वृत्तसंस्था
आयसीसी पुरुषांच्या टी-20 विश्वचषक पात्रता अ स्पर्धेत झालेल्या अंतिम सामन्यात मोहम्मद वासिमच्या शानदार शतकाच्या जोरावर संयुक्त अरब अमिरातने (युएई) आयर्लंडचा 7 गडय़ांनी पराभव केला.
या सामन्यात संयुक्त अरब अमिरातने आयर्लंडवर आठ चेंडू बाकी ठेवून विजय नोंदविला. या वर्षाच्या अखेरीस ऑस्ट्रेलियात होणाऱया आयसीसी पुरुषांच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत युएई आणि आयर्लंड या दोन्ही संघांनी आपली तिकिटे आरक्षित केली आहेत. गुरुवारच्या सामन्यातील विजयामुळे युएई संघाने विश्वचषक स्पर्धेच्या गट-1 मध्ये स्थान मिळविले आहे. याच गटात लंका व नामिबिया यांनीही स्थान मिळविले आहे. पात्रता ब स्पर्धा जूनमध्ये झिमाब्वेत होणार असून यातील उपविजेता संघही मुख्य स्पर्धेच्या गट-1 मध्ये सामील होणार आहे. आयर्लंडचा विंडीज आणि स्कॉटलंड यांच्यासह मुख्य स्पर्धेच्या गट-2 मध्ये समावेश झाला आहे. झिम्बाब्वेतील पात्रता ब स्पर्धेच्या विजेत्यालाही त्यात स्थान मिळणार आहे.
आयर्लंड आणि युएई यांच्यातील सामना युएई संघाचा सलामीचा फलंदाज मोहम्मद वासिमने 112 धावांची खेळी केली. आयर्लंडविरुद्ध वासिमचे हे दुसरे शतक आहे. रोहन मुस्तफाने नाबाद 32 धावा जमविल्या. रोहन आणि वासिम यांनी 141 धावांची भागिदारी केली. वासिम बाद झाला त्यावेळी युएई संघाला विजयासाठी 12 चेंडूत 6 धावांची जरुरी होती. अखेर युएई संघाने 18.4 शतकात 3 बाद 160 धावा जमवित हा सामना सात गडय़ांनी जिंकल्या तत्पूर्वी आयर्लंड संघाने 159 धावा जमविल्या होत्या.