मनुष्यबळात प्रतिदिन 100 कोडर्स जोडले जाणार
संयुक्त अरब अमिरात म्हणजेच युएई एकीकरणाला 50 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करत आहे. 2 डिसेंबर रोजी देशाचा 50 वा राष्ट्रीय दिन आहे. यानिमित्त पुढील 50 वर्षांमध्ये देशायच विकासाला वेग देण्यासाठी प्रोजेक्ट-50 च्या पहिल्या टप्प्यातील योजनांची घोषणा करण्यात आली आहे. यात देशाच्या अर्थव्यवस्थेला डिजिटल स्वरुप देण्यावर विशेष भर असणार आहे.
पहिल्या टप्प्यात नवे व्हिसा, गुंतवणूक योजना आणि जगाच्या गुणवत्तेसाठी व्यापक संधींची घोषणा करण्यात आली आहे. प्रोजेक्ट-50 डिजिटल आणि प्रवाही अर्थव्यवस्थेसोबत कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित ऍप तसेच चौथ्या औद्योगिक क्रांतीत गुंतवणुकीला वेग देणार आहे. या योजनांच्या अंतर्गत पहिला फेडरल फ्रीलान्स व्हिसा प्रदान केला जाईल. याचबरोबर पहिल्यांदाच 15 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या किशोरवयीनांना पार्टटाईम काम करण्याची सूट मिळणार आहे.
गोल्डन व्हिसा योजनेचा विस्तार करून व्यवस्थापक, सीईओ, वैज्ञानिक, इंजिनियर्सना सामील केले जाईल. ग्रीन व्हिसा योजनेत आता युवांना प्रायोजित करण्याची वयोमर्यादा 18 वरून वाढवत 25 वर्षे करण्यात आली आहे. रोजगार गमावल्यास किंवा निवृत्त झाल्यास देश सोडण्याचा कालवधी 30 ऐवजी 90-180 दिवस करण्यात आला आहे.
याचबरोबर योजनेत दर महिन्याला 300 कोडर देशाच्या वर्कफोर्समध्ये सामील करून एक वर्षात कोडर्स 64 हजारांहून 1 लाख करण्याचे लक्ष्य आहे. प्रोग्रामर्स आणि कोडर्सना एक लाख व्हिसा दिले जातील.