होमगार्डनीही घेतली समानतेची शपथ : कन्नड-सांस्कृतिक खाते, नेहरू युवा पेंद्रातर्पे आयोजन
प्रतिनिधी /बेळगाव
येथील कन्नड व सांस्कृतिक खाते, नेहरु युवा केंद्र, अंजुमन कला आणि वाणिज्य महाविद्यालयाच्यावतीने शुक्रवारी संविधान दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रा. डॉ. एच. बी. कोलकार यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी अंजुमन कॉलेजचे प्राचार्य डॉ. एच. आय. तिम्मापूर, नेहरु युवा केंद्राचे रोहित कलरा, कन्नड व सांस्कृतिक खात्याच्या उपसंचालिका विद्यावती बजंत्री, भरत कलाचंद्र, सुजाता मगदूम, सुप्रिया कलाचंद्र आदी उपस्थित होते.
सामाजिक समता नसलेले स्वातंत्र्य अर्थहिन आहे. जाती व्यवस्था, लिंगभेद दूर करून साऱयांचा विकास व्हावा, समान भारत व्हावे, यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लढा दिला, असे डॉ. एच. बी. कोलकार यांनी सांगितले. यावेळी बोलताना डॉ. एच. वाय. तिम्मापूर म्हणाले, बौद्ध धर्मामध्ये समानता आहे म्हणून बाबासाहेबांनी तो धर्म स्वीकारला. सामाजिक न्यायासाठीच त्यांनी घटना लिहिली. श्वेता अगसीमनी यांनी स्वागत केले. वैशाली बबली यांनी सूत्रसंचालन केले. दरम्यान, संविधान दिनानिमित्त येथील होमगार्ड विभागाने समानतेची शपथ घेण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. जिल्हा कमांडन्ट किरण नाईक यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.