श्रीनगर
दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिह्यातील शमसीपोरा भागात बुधवारी दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा भारताची कुरापत काढली. भारतीय लष्कराच्या रोड ओपनिंग पार्टीवर दहशतवाद्यांकडून ग्रेनेड हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात चार जवान जखमी झाले आहेत. जखमी जवानांना लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. लष्कराच्या सूत्रांनी या वृत्तास दुजोरा दिला आहे. ग्रेनेड हल्ल्याच्या घटनेनंतर जवानांनी संबंधित परिसरास वेढा दिला व दहशतवाद्यांना पकडण्यासाठी शोधमोहीम सुरू केली आहे.