- दिवसभरात 3,688 नवे रुग्ण; 54 मृत्यू
ऑनलाईन टीम / नागपूर :
नागपूरमध्ये संसर्ग वाढीचा आलेख वाढताच असून आज दिवसभरात 3,688 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 54 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे शहरात कोरोना रुग्णांची एकूण संख्या 2 लाख 14 हजार 850 वर पोहोचली आहे. सद्य स्थितीत 37,343 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
दिवसेंदिवस वाढत असलेल्या रुग्ण संख्येमुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. दरम्यान, आज दिवसभरात 3,227 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर आतापर्यंत 1 लाख 72 हजार 634 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
दरम्यान, कोरोनामुळे आतापर्यंत 4,873 जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला. या पार्श्वभूमीवर नागपूरमधील निर्बंध 31 मार्चपर्यंत कायम ठेवण्यात आले आहेत.