शिक्षणाला कुठलाच धर्म नसतो हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. राजस्थानच्या सवाई माधोपूर येथील रहिवासी असलेली मुस्लीम युवती अस्मत परवीन संस्कृत व्याकरण आचार्यमध्ये सुवर्णपदकाची मानकरी ठरली आहे. अस्मतने मदरशामधून संस्कृत व्याकरण आचार्य विषयात सुवर्णपदक मिळविण्यापर्यंतचा प्रवास केला आहे. अस्मतने परीक्षा केंद्रावर 5 मिनिटे उशिरा पोहोचल्याने परीक्षा देण्यापासून रोखण्यात आल्यावरही हे यश मिळविले आहे.
मध्यमवर्गीय मुसलीम कुटुंबात वाढलेली अस्मत परवीनचे प्रारंभिक शिक्षण मदरशात झाले आहे. अस्मतचे वडिल मंजूर आलम शिर्वानी हे शासकीय विद्यालयात प्राचार्य राहिले आहेत. मदरशानंतर अस्मतने खासगी शाळेत शिक्षण घेतले होते.
अस्मतने संस्कृत विषयाची निवड केली होती. स्वतःच्या बहिणींकडून प्रेरणा घेत अस्मतने शास्त्राr परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होत संस्कृत व्याकरणात आचार्य (एकप्रकारची पदवी) करण्याचा निश्चय केला होता. जगद्गुरु रामानंदाचार्य राजस्थान संस्कृत विद्यापीठाकडून सुवर्णपदकासाठी प्रसिद्ध 14 गुणवंतांच्या यादीत अस्मतचा समावेश होता. पण, इथपर्यंत पोहोचण्यासाठी अस्मतला एक कठोर परीक्षाही द्यावी लागली आहे. अस्मत काही कारणास्त परीक्षा केंद्रावर 5 मिनिटे उशिराने पोहोचली होती. यामुळे अस्मतला परीक्षा देण्यापासून रोखण्यात आले होते. 25 मिनिटांनी अस्मतला परीक्षेस बसू देण्यात आले तरीही तिने कमाल करून दाखविली आहे. विद्यापीठाकडून आयोजित दीक्षांत सोहळय़ात तिला गौरविण्यात येणार आहेत. संस्कृत भाषेत पीएचडी करून ती प्राध्यापिका होऊ इच्छिते.