प्रतिनिधी/ बेळगाव
मराठा समाजाला एका छताखाली आणण्यासाठी सकल मराठा समाजाच्यावतीने प्रयत्न केले जात आहेत. या समाजाला स्वतःचे कार्यालय उपलब्ध व्हावे यासाठी जत्तीमठ येथे मध्यवर्ती कार्यालय सुरू करण्यात आले आहे. या कार्यालयाचे उद्घाटन शुक्रवारी सायंकाळी सीमा सत्याग्रही रामा शिंदोळकर यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांनी मराठा समाजाच्या विकासासाठी कार्य करत राहू, असे आश्वासन दिले. मराठा समाज एकत्रित येण्यासाठी यापुढील काळात प्रत्येक विभागात व गावागावात जागृती केली जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
यावेळी भाजप नेते किरण जाधव, डॉ. सोनाली सरनोबत, माजी महापौर शिवाजी सुंठकर, दत्ता जाधव, चंद्रकांत कोंडुसकर, संजय कडोलकर, साहित्यिक गुणवंत पाटील, माजी महापौर विजय मोरे, नगरसेविका वैशाली भातकांडे, सुनील जाधव यासह मोठय़ा संख्येने मराठा समाजातील मान्यवर उपस्थित होते.