ऑस्ट्रेलियाच्या उत्तर भागात एक पर्वत असून त्याला उलुरू तसेच आर्यस रॉक असेही म्हटले जाते. हा पर्वत दररोज सकाळ-संध्याकाळ रंग बदलत असतो. प्रत्येक ऋतूत याचा रंग बदलतो. हा पर्वत आता युनेस्कोच्या वारसास्थळांच्या यादीत सामील आहे.
सरडा रंग बदलत असल्याचे सर्वांनीच ऐकले आहे. पण पर्वताने रंग बदलण्याची बाब हैराण करणारी आहे. ऑस्ट्रेलियाच्या आदिवासी लोकांची वस्ती असलेल्या भागात हा पर्वत आहे. या पर्वताविषयी सर्वप्रथम 150 वर्षांपूर्वी कळले होते. 1873 मध्ये याचा शोध इंग्रज डब्ल्यूसी गोसे यांनी लावला होता. त्या काळात हेन्री आर्यस पंतप्रधान असल्याने त्यांचे नाव या पर्वताला देण्यात आले, पण स्थानिक लोक याला उलुरु पर्वत म्हणूनच ओळखतात.
हा पर्वत अंडाकृती असून 335 मीटर उंचर आणि त्याचा आकार 7 किलोमीटरमध्ये फैलावलेला आहे. सर्वसाधारणपणे पर्वताचा रंग लाल असतो. याच्या रंगांमध्ये चमत्कारिक बदल सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत होतो. पहाटे सूर्यकिरणे या पर्वतावर पडली असता जणू आग लागली आहे असा भास होतो.
याचप्रकारे सूर्यास्त होऊ लागल्यावर लाल रंगाने चमकणाऱया या विशार पर्वतावर जांभळय़ा रंगाची सावली दिसून येते. सकाळ ते संध्याकाळपर्यंत कधी याचा रंग पिवळा, कधी नारिंगी तर कधी लाल होऊ होतो. तर कधी हा पर्वत जांभळय़ा रंगात दिसून येते.
हा चमत्कार असून एका विशेष संरचनेमुळे हे घडते. याच्या दगडाची संरचना विशेष प्रकारची आहे. सूर्यकिरणांचे दिवसभर बदलणारे कोन आणि हवामानातील बदलामुळे याचे रंग बदलतात. हा पर्वत स्टँडस्टोनने तयार झाला आहे.
रंगांमधील बदलांमुळे प्राचीन काळात येथे राहणारे समुदाय याला देवाचे घर मानायचे. पर्वताच्या पायथ्याला असलेल्या गुहांमध्ये पूजा केली जायची. तर आता या पर्वतापर्यंत पोहोचण्यासाठी रस्ते तयार करण्यात आले असून हे मोठे पर्यटनस्थळ ठरले आहे.
ऑस्ट्रेलियाच्या सरकारने या पर्वताच्या परिसरात 487 चौरस मैलाच्या क्षेत्रात माउंट ओल्गा राष्ट्रीय उद्यान तयार केले असून यात कांगारू, बँडीकूट, वालाबी आणि युरो यासाख्या विचित्र प्राण्यांना ठेवण्यात आले आहे.
दरवर्षी हजारो लोक हा पर्वत पाहण्यासाठी येतात. काही किलोमीटर अंतरावर बसून दिवसभरात याचे बदलणारे रंग अनुभवले जातात. काही लोक पर्वतावर ट्रेकिंग करतात. जगात याच्यासारख्या रंग बदलणारा दुसरा पर्वत नाही.