ब्रिजटाऊन-बार्बाडोस / वृत्तसंस्था
लँकेशायरचा सीमर सकिब महमूदला विंडीजविरुद्ध कसोटी पदार्पणाची संधी देण्यात आली. येथील केन्सिंग्टन ओव्हल मैदानावर आयोजित दुसऱया कसोटी सामन्यासाठी इंग्लंडने हा एकमेव बदल केला. दुखापतग्रस्त मार्क वूडऐवजी सकिबचा समावेश करण्यात आला. डरहॅमचा मार्क वूड उजव्या ढोपराच्या दुखापतीमुळे या लढतीत खेळणार नसल्याचे यापूर्वीच स्पष्ट झाले होते. बुधवारी शेवटचे वृत्त हाती आले, त्यावेळी इंग्लंडने पहिल्या दिवशी 12 षटकात 1 बाद 26 अशी सुरुवात केली होती. विंडीज-इंग्लंड यांच्यातील पहिली कसोटी यापूर्वी अनिर्णीत राहिली आहे.