ऑनलाईन टीम / व्हिएन्ना :
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक देशांमध्ये लसीकरण मोहिमेने वेग घेतला आहे. ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्नाच्या संसदेनेही नुकताच सक्तीच्या लसीकरणाबाबतचा एक कायदा मंजूर केला. त्यानुसार फेब्रुवारी महिन्यापासून प्रत्येक नागरिकासाठी लसीकरण करून घेणं सक्तीचं असणार आहे. मात्र, या सक्तीच्या विरोधात देशातील जनता रस्त्यावर उतरली आहे. सरकारच्या या निर्णयाविरोधात देशात अनेक ठिकाणी आंदोलने करण्यात येत आहेत.
व्हिएन्नामध्ये सध्या कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असून त्यावर उपाययोजना करण्यासाठी सक्तीचं लसीकरण हाच योग्य पर्याय असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. मात्र, येथील नागरिकांना सक्तीचे लसीकरण नको आहे. बहुतांश लोकांनी सरकारच्या या निर्णयाला विरोध करत आंदोलन छेडले आहे. दरम्यान, एका मासिकाने यासंदर्भात एक पोल आयोजित केला. त्यामध्ये मतदान केलेल्यांपैकी 51 टक्के लोक सक्तीच्या लसीकरणाविरोधात आहेत. 34 लोकांचा मुळात लसीकरणालाच विरोध आहे. तर 14 टक्के लोकांचे म्हणणे असे आहे की, सरकारने निर्णय घेण्यास घाई केली.