ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात आतापर्यंत 2 कोटी 95 लाख 10 हजार 410 लोक कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. त्यामधील 2 कोटी 81 लाख 62 हजार 947 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून, सध्या 9 लाख 73 हजार 158 रुग्ण उपचार घेत आहेत.
देशात रविवारी 70 हजार 421 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 1 लाख 19 हजार 501 रुग्ण कोरोनामुक्त झाले. 3921 रुग्णांचा मृत्यू झाला असून, मृतांची एकूण संख्या 3 लाख 74 हजार 305 एवढी आहे. आतापर्यंत 25 कोटी 48 लाख 49 हजार 301 जणांना लस देण्यात आली आहे.