सलग दुसऱ्या दिवशी 1.60 लाखांहून अधिक बाधित रुग्ण
ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारतात आतापर्यंत 1 कोटी 36 लाख 89 हजार 453 रुग्ण कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. त्यामधील 1 कोटी 22 लाख 53 हजार 697 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले आहेत. तर अजूनही 12 लाख 64 हजार 698 रुग्ण उपचार घेत आहेत.
दरम्यान, देशात मागील 24 तासात 1 लाख 61 हजार 736 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 97 हजार 168 रुग्ण कोरोनामुक्त झाले. 879 रुग्णांचा मृत्यू झाला असून, मृतांची एकूण संख्या 1 लाख 71 हजार 058 एवढी आहे. आतापर्यंत पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील 10 कोटी 85 लाख 33 हजार 085 जणांना लस देण्यात आली आहे.
देशात आतापर्यंत 25 कोटी 92 लाख 07 हजार 108 नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यामधील 14 लाख 122 कोरोना चाचण्या सोमवारी (दि.12) करण्यात आल्या.