ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारतात आतापर्यंत 1 कोटी 13 लाख 33 हजार 728 रुग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 1 कोटी 09 लाख 73 हजार 260 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले आहेत. तर 02 लाख 02 हजार 022 रुग्ण उपचार घेत आहेत.
देशात मागील 24 तासात 24 हजार 882 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 19 हजार 957 रुग्ण कोरोनामुक्त झाले. 140 रुग्णांचा मृत्यू झाला असून, मृतांची एकूण संख्या 1 लाख 58 हजार 446 एवढी आहे. आतापर्यंत पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील 2 कोटी 82 लाख 18 हजार 457 जणांना लस देण्यात आली आहे.
देशात आतापर्यंत 22 कोटी 58 लाख 39 हजार 273 नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यामधील 06 लाख 40 हजार 635 कोरोना चाचण्या शुक्रवारी (दि.12) करण्यात आल्या.