ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशभरात आतापर्यंत 2 कोटी 71 लाख 57 हजार 795 लोक कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. त्यामधील 2 कोटी 43 लाख 50 हजार 816 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून, सध्या 24 लाख 95 हजार 591 रुग्ण उपचार घेत आहेत.
देशात मंगळवारी 2 लाख 08 हजार 921 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 2 लाख 95 हजार 955 रुग्ण कोरोनामुक्त झाले. 4157 रुग्णांचा मृत्यू झाला असून, मृतांची एकूण संख्या 3 लाख 11 हजार 388 एवढी आहे. आतापर्यंत 20 कोटी 06 लाख 62 हजार 456 नागरिकांना लसीचा पहिला आणि दुसरा डोस देण्यात आला आहे.