शुक्रवारी 24 नवे रुग्ण, 12 जण झाले बरे
प्रतिनिधी /बेळगाव
कोरोनाच्या सक्रिय रुग्णसंख्येत शुक्रवारी किंचित वाढ झाल्याचे दिसून आले आहे. गेल्या 24 तासांत 24 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून कोरोनामुक्त झालेल्या 12 जणांना वेगवेगळय़ा इस्पितळांतून घरी पाठविण्यात आले आहे.
गुरुवारी जिल्हय़ातील सक्रिय रुग्णांची संख्या 330 इतकी होती. शुक्रवारी ही संख्या 342 वर पोहोचली असून हा आकडा 12 ने वाढला आहे. जिल्हय़ातील एकूण बाधितांची संख्या 79 हजार 309 वर पोहोचली आहे. आतापर्यंत 78 हजार 74 जणांनी कोरोनावर मात केली आहे.
मृतांचा सरकारी आकडा राज्य हेल्थ बुलेटिनमधील माहितीनुसार 894 इतका आहे. तर जिल्हा सर्वेक्षण विभागाने जारी केलेल्या पत्रकातील माहितीनुसार हा आकडा 893 इतका आहे. गुरुवारपासून मृतांच्या आकडय़ातील घोळ सुरूच आहे. शुक्रवारच्या अहवालातही असाच उल्लेख आहे. अद्याप 5 हजार 318 जणांचे अहवाल यायचे आहेत.