दिवसभरात 1.20 लाख नवे बाधित – 1.97 लाख रुग्णांना डिस्चार्ज
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. तर कोरोनाच्या विळख्यातून सुखरूप बाहेर पडणाऱया रुग्णांची संख्या वाढत आहे. गेल्या 24 तासांत देशात 1 लाख 20 हजार 529 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 1 लाख 97 हजार 894 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला असून 3 हजार 380 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर देशात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 15 लाख 55 हजार 248 पर्यंत खाली आली आहे. देशात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्यामुळे दिलासादायक वातावरण आहे. देशात एकूण कोरोना रुग्णांची संख्या 2 कोटी 86 लाख 94 हजार 879 इतकी आहे. तर आतापर्यंत 3 लाख 44 हजार 082 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून 2 कोटी 67 लाख 95 हजार 549 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.