बुधवारी 27 नवे रुग्ण : रुग्णसंख्येत वाढ : नियमांचे पालन आवश्यक
प्रतिनिधी / बेळगाव
कोरोना रुग्णसंख्येत वाढ सुरूच आहे. बुधवारी जिह्यातील 27 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सक्रिय रुग्णांची संख्या 121 वर पोहोचली आहे. बेळगाव शहर व तालुक्मयात 11 नवे रुग्ण आढळून आले आहेत.
जिल्हा सर्वेक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार अनगोळ परिसरात चार रुग्ण आढळून आले आहेत. पोलीस हेडक्वॉर्टर्स, टिळकवाडी, कुवेंपूनगर, विश्वेश्वरय्यानगर, सदाशिवनगर, शाहूनगर परिसरातही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून रायबाग तालुक्मयातील बुवाची सौंदत्ती येथे आणखी 9 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
जिह्यातील एकूण बाधितांची संख्या 27 हजार 103 वर पोहोचली असून त्यापैकी 26 हजार 640 जणांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. 121 सक्रिय रुग्णांवर वेगवेगळय़ा इस्पितळात उपचार करण्यात येत आहेत. अद्याप 1524 जणांचा अहवाल यायचा आहे.
कर्नाटकातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन मास्क, सॅनिटायझरचा वापर व सामाजिक अंतर हे नियम काटेकोरपणे पाळण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले असून लॉकडाऊन नको असेल तर प्रत्येकांनी नियमांचे पालन करण्याची सूचना अधिकाऱयांनी केली आहे. जिह्यात अद्याप 18 हजार 546 हून अधिक जण 14 दिवसांच्या होमकेअरमध्ये आहेत.
अफवांचे पीक
कर्नाटकात वाढत्या रुग्णसंख्येमुळे शाळांना सुटी देण्यात आली आहे. नाईट कर्फ्यु लागू करण्यात आला आहे. लॉकडाऊनही जारी करण्याची सूचना देण्यात आली आहे, अशा अफवांचे पीक बुधवारी दिवसभर आले होते. काही वृत्तवाहिन्यांचे गेल्या वषीचे व्हिडीओ क्लिपींग व्हायरल करून अफवा पसरविण्यात येत होत्या. मात्र, स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार कर्फ्यु, लॉकडाऊन किंवा शाळांना सुटी घोषित केली नाही. मात्र, प्रत्येकांनी नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.